मनीच्या कुशीत

मनीच्या कुशीत झोपलय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन..... 

लहानपणी हे गाणे गाताना फार मज्जा वाटायची. आईच्या कुशीत झोपलेली मांजराची गोंडस पिल्ले आणि त्यांचे सुरेख वर्णन. आत्ता हे गाणे ऐकताना अचानक जाणवले की कुशीत झोपणे ही  पण एक गंमत असते ना. लहान मुलांना मायेची उब मिळावी म्हणून कुशीत झोपवतात. पण त्या स्पर्शाचे महत्त्व फक्त झोप लागण्यापुरते मर्यादित नसते हे मात्र नक्की. एक भक्कम मानसिक आधार, आपल्याला काहीच त्रास होणार नाही याची खात्री आणि आपले हक्काचे कोणीतरी आहे असा विश्वास अश्या कितीतरी गोष्टी या कुशीत गवसतात. आजीच्या साडीची गोधडी घेऊन झोपताना तिच्या स्पर्शाची आणि मायेची जाणीव ही होतेच. मोठे होतो तसे कुशीची जागा मिठी घेते पण भावना त्याच राहतात. लहान मुलींना मी जेव्हा बाहुलीला झोपवताना बघते तेव्हा वाटते कि इतरांना आपला आधार वाटावा असे वागणे फार आधीच शिकतो का आपण?  लहान भावंडांची काळजी घेणारा छोटुकला दादा किंवा ताईसुध्दा किती प्रेमाने करत असतात सर्व! पण मग मोठेपणी काय बिनसते? उगाचच भावनाविरहित मिठ्या का मारतो आपण? काळजी करणे नाही तर काळजी आहे हे दाखवणे हे फार जास्त महत्वाचे झाले आहे म्हणून? प्रत्येक स्पर्शाचे अर्थ विसरून जायला होतंय का? आत्ता या परिस्थितीमध्ये कितपण शक्य होईल माहित नाही पण भविष्यात जेव्हा केव्हा कुणाला जादू कि झप्पी देऊ तेव्हा त्या व्यक्तीला ती जादू जाणवेल असा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो नाही का?

Comments

  1. Replies
    1. अतिशय सुंदर. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

      Delete
    2. धन्यवाद :)

      Delete
  2. उत्तम लेख!!👌 उत्तम संकल्पना!! 👌 Keep going....👍

    ReplyDelete
  3. खुप खुप छान.

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लिखाण..👍👌

    ReplyDelete
  5. काळजी करणे नाहीतर काळजी आहे हे दाखवणे याला अधिक महत्ता आली आहे. हे वाक्य टोचल. ☹️

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts