Skip to main content

Posts

Featured

बदल

मकर संक्रांत आली की तिळगुळासोबत अजून एक गोष्ट आठवते - हळदीकुंकू. आईचे हळदीकुंकू ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत आणि ट्रेनमध्ये रोज एकत्र प्रवास करणाऱ्या मैत्रिणींसोबत होते त्यामुळे आमच्या घरी कुणी हळदीकुंकवाला येत नाही. पण माझ्या आजोळी तसे नाही, मामीच्या मैत्रिणी आणि शेजारी असे सर्व घरी जमतात. यंदा मला आजोळी हळदीकुंकू बघायचा योग आला. कार्यक्रम नेहेमीसारखाच पार पडला पण एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे हळदीकुंकवाची बदलेली वेळ. माझ्या लहानपणी आजी मला सर्व बायकांना आमंत्रण द्यायला पाठवायची. तेव्हा साधारण पाच-साडेपाच पर्यंत आमच्याकडे हळदीकुंकवाला या असे सांगितल्याचे मला आठवते. साडे सहापर्यंत सर्व जणी घरी जाऊन स्वयंपाकाला लागायच्या सुद्धा. मामीने मात्र  सर्वांना साधारण सात-साडेसात वाजताचे आमंत्रण दिले होते. तिच्या काही मैत्रिणी सर्व स्वयंपाक आवरून आल्या तर काही नाही. अर्थात साडेसातला आल्यामुळे त्यांना निघेपर्यंत सव्वाआठ- साडेआठ झाले. पण कुणीही घरी लवकर जाण्याच्या गडबडीत नव्हते. हा तसे बघितले तर छोटासा फरक पण 'सातच्या आत घरात' हा नियम आता सुनांनाही लागू होत नाही (निदान शहरी भागात तरी) हे यातून अ...

Latest posts

Social Media Diet

पुनश्च हरी ओम!

स्वांंतःसुखाय

सीमोल्लंघन

चवीपुरते......

ऋतू हिरवा

आषाढस्य प्रथम दिवसे⎸

मनीच्या कुशीत

कृष्ण