पुनश्च हरी ओम!

गेल्या वर्षात मी फक्त एकच लेख काय तो लिहिला. कारण अर्थात माझा आळस दुसरं काय? बरेच काही लिहिता आले असते पण असो. यापुढे मी नियमितपणे लिहिण्याचा संकल्प करत आहे. दर रविवारी एक लेख. आता दर आठवड्यात असा काही नवीन विषय सुचेलच असे नाही पण तरीदेखील लिहिणे गरजेचे आहे. याची तीन कारणे आहेत -
१) मला सवय लागावी म्हणून
२) विचारांना वळण म्हणून
३) विषय मुद्देसुदरीत्या मांडता येण्याचा सराव म्हणून
मी आठवड्याभरात काही वाचले, ऐकले, विचार केला तर त्याबद्दल मला नक्कीच लिहिता येईल. तसेच काहीतरी लिहायचे म्हणून मी विचार करायला लागेन. समर्थांनी म्हटलेच आहे ना "दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे". तर भेटू दर रविवारी एका नवीन लेखासोबत.


Comments

Popular Posts